मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

दुर्गंध आपल्या विचारांचा !!


       स्वप्न मनामध्ये रंगवता रंगवता कधी झोप आली ते कळलेच नाही, संध्याकाळी सुमारे 'पाच' वाजता वडिलांनी  कॉल केला, वडिलांचा कॉल म्हणजे महिन्यात एकदा, फोन मध्ये 'बाबा' असे दिसले आणि स्वप्नांना पूर्णविराम दिला व फोन उचलला......

बाबा: या आठवड्यात दोन, तीन सुट्ट्या आहे, येतोस का घरी.....

मी: बघतो.......कळवतो तुम्हाला. 

     दोन मिनिटे बोलून फोन ठेवला व विचार करत बसलेलो, " जायचे काय घरी..........?" विचारांनी होकार देत पर्यंत ५:२० झाल्याचे घड्याळीने दर्शवलेले, लगेच तयारी केली व पुणे स्टेशन गाठले, वेळेवरची तयारी असल्याने रिजर्ववेशन नव्हते, वेळ होती आता जनरल मध्ये जायची आणि रेल्वे होती 'आझाद हिंद एक्सप्रेस' (हावड़ा) प्लॅट फॉम  क्रमांक ५ वर पोहचलो, जनरलचा डब्बा शोधत निघालो. अखेर डब्बा दिसला, बघतोय तर लोक डब्यातील गेट वर लटकत होते. एक क्षणासाठी असे वाटले की नकोच जायला, पण एकदा ठरवले ते ठरवले, आणि कसाबसा गेटच्या पायऱ्यांवर  चढलो लोकांनी जरा जागा दिली व गेट जवळ उभा राहिलो, ६:२५ ला रेल्वेनी पुणेचा निरोप घेतला आणि प्रवासांच्या गोष्टी रंगात आल्या, रेल्वे हावड़ा असल्याने उत्तरे कडील संख्या जास्त होती त्यामुळे लोकांचे भाषांचे कौशल्य समजेपर्यंत रेल्वे दौंडला पोहचली, रेल्वे इंजिन बदलत असल्याने २० मिनिटांची ब्रेक लोकांच्या हाती लागला , पोटाला चिमटा पकडून ठेवलेले  लोक दौंड मधील वडापाव वर चांगलाच हाथ मारतांना दिसले, वेळेवरची तयारी असल्यानी  पोटाला हातभार म्हणुन थंड्या वडापाव वर मी पण चांगलाच दाव मारला.

         तेवढ्यात तपासणीसाठी दोन पोलीस आमच्या (जनरल) डब्ब्यात शिरली, आम्ही चार, पाच मुले मराठीत बोलत असल्याने त्या पोलीसांनी आम्हाला गोड स्माइल दिली व आपल्या भारतातील उत्तरेकडील लोकांनकडे वळले आणि तपासणी सुरु झाली अणि ही तपासणी सर्वांन समोर न होता शौचालयात होत होती, 'पाच ' लोकांची तपासणी झाली त्यात काही सापडले नसल्याने पोलिस खुश नसून  नाखुश  दिसत होती, नजर तिष्ण असल्याने त्यांना एका प्रवाश्याची ( उत्तेरेकडीलच ) पिशवी दिसली  त्यात  त्यांना पंखा  सापडला  आणि  लगेच  सहाव्या  व्यक्तीचे  स्वागत  शौचलयात  करण्यात  आले , बाहेर आल्यावर  नाखुश  असलेली  पोलीसांच्या  मुखावर  गड  जिंकल्याचे  सुख जाणवत होते  व  त्या  प्रवाश्याचे  पापण्य  फडफडत  होते , एक  जागरूक नागरिक  म्हणून  विचारपूस  केल्यास कळले की मारहाण   करुण  '२००० ' रुपयात  गड  जिंकल्या गेले. आपले गड जिंकलेले शिपाई डब्ब्यातुन उतरतांनी  आम्हा  मराठी बांधवानकडे काही वाक्य बडबडले............


" कुठे ह्या  भैय्या  लोक्कांच्या  दुर्गंधेत  हा प्रवास करता ??......जा आणि स्लिपर  मध्ये बसा "


 दुर्गंध  हा  कधी शरीराचा  नसतोच , असतो तो आपल्या विचारांचा ,आपल्या बेईमाणीचा 

        खरंच या आपल्या सुसंस्कृत  देशाला कीड  लागली आहे काय?...........की ही कीड आपल्या सुसंस्कृत देशाला नसून सुसंस्कृत नागरिकाला लागली आहे ?


                                                           
                                                                         

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वास...