शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वासुदेवाने श्रीकृष्ण यांना गाय पाळणारे  ‘नंद’ यांच्या घरी लपवून ठेवले.
               गाय पाळणारे यांचा संस्कृत नियमावलीत अर्थ लावायचा असल्यास, ‘गोपाळ’ असा निघतो. तेच साहित्य शाखेच्या अभ्यासानुसार गोपाळ या शब्दाचे अपभ्रष्ट रूप हे गोल्ला ऊर्फ गोलकर असे सांगितले. प्रामुख्याने ज्या प्रदेशाच्या वातावरणाने हाक मारली तो प्रदेश आपला मानणारे हेच ते भटकी जमात गोल्ला ऊर्फ गोलकर.
              भटका हा शब्द भूतकाळात विसरल्याने, आता आधुनिकेच्या नशेत भ्रमंती करताना जरा भूतकाळात डोकावून बघितलं. की आठवत ते गायगोधन, आजीने पाठ करून घेतलेलं " दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी", अंगणातील गोविष्टा चे सारवण आणि ह्या सगळ्यांचे महत्व हे एक आठवण म्हणून घर करून बसलेलं आहे. खरं हे आठवण म्हणणे पटतय काय आपल्याला....?
               आजही भूतकाळातील आठवणीने वर्तमानात काही अंश ठेवलेले आताही जाणवते. ज्यासाठी लोक आत्ताही त्या जातीची आठवण काढून फेरफटका मारताना दिसतात. जसे उदाहरण द्यायचे म्हटल्यास, जात पडताळणी, जातीचा दाखला आणि इत्यादी... पणअश्या सगळ्या गोष्टींना अपवाद म्हणजे वर्तमानाला भूतकाळाची आवर्जून जोड देणारे  लोक, आत्ता पण समाजात काही संख्येत सापडतात. ज्यांना आज पण फक्त आणि फक्त समाज प्रबोधना विषयी चिंता असते आणि चिंते पलिकडे त्यांचे समाजावरील काम प्रखरून दिसते.

              जरा खोलवर निरीक्षण केल्यास असा जाणवतंय की आधुनिकतेकडे वळलेल्या समाजाला आजच्या युगात फार महत्त्वाचे मोल आहे. काहींचे यावर पारदर्शकपणे प्रोत्साहन पण आहे. त्यात काही चूक नाही. पण त्याच आधुनिकतेला आपल्या समाजातील भूतकाळाचे महत्त्व असल्याचे विसरतोय काय ...? की आयुष्यातील भ्रमंती दुर्लक्ष करण्यास भाग पाडत आहे…? मला आजही आठवते एकदा दिवाळीत घर स्वच्छ करताना वडिलोपार्जित दुधाचे माप सापडले ते आजींनी आठवण म्हणून ठेवायला मला सांगितलेले. ज्या समाजाने माणूस म्हणून जन्मास आल्यावर एक जीवन जगण्यासाठी अर्थ दिला त्या समाजातील गोष्टींना आठवण म्हणून स्वीकार करणे हे पटने योग्य कसे असेल...?
            आपल्या भूतकाळातील आठवणी हे आपल्या पुढच्या पिढी साठी हि त्यांच्या वडिलोपार्जितांची आठवणच असेल काय...?   जरा मन घट्ट धरून आणि पापण्या बंद करून विचार केला की  असे जाणवते की आधुनिकतेच्या नशे पासून रक्षण करण्यासाठी आपल्याला ही नंदगोपाळच्या घरी आसरा घ्यावाच लागेल…

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वास...