रविवार, १९ मे, २०१९

नैराश्याचे हिंस्त्र रूप....

        जेव्हा सूर्यकिरणा बरोबर तुमच्या फोनवर संदेश येतो की तुमच्यातील व्यक्ती नाहीस झालंय. तेव्हा असा जाणवत की एक कृत्रिम स्वप्न बघताय की काय.....?  पण एकदा झोप उडाली आणि सत्याशी गाठ झाली की हृदयातील ठोका आणि वेदना यांच्याशी समतोल राखणे हे कठीण असते, हे सांगणे म्हणजे 'मूर्ख' अशी उपमा स्वतःला देणे.

        ओळख झाली वर्ग ८ वी मध्ये प्रसंग शाळेतील क्रिकेट टीम, आमच्यासाठी देव असलेला क्रिकेट टीम चा कॅप्टन हाच तो व्यक्ती, तुला बॅटिंग जमत नाही तू लेफ्टी असल्याने बॉलिंगचा सराव कर, पण कालांतरने सांगणारा क्रिकेट नाही जमणार आपणास, पण सराव सोडू नकोस असेही आवर्जून सांगणारा. जिल्हा स्टेडियम वर पहिल्या ओव्हर मधील पहिल्या बॉल वर ओपनिंग करून; शेवटच्या ओव्हर मधील शेवटच्या बॉल वर टिकून शाळेतील नाव उंचावणारा, फक्त क्रीडा क्षेत्रात नसून वर्ग ८ वी  व ९ वी च्या निकालात वर्गातून प्रथम क्रमांकाने फक्त त्याच्या नावाने नाहीतर अभ्यासातील गोडीने शिक्षकांच्या मनात घर बसवले हे आजही आठवते, वर्गातील हुशार व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा पण इंग्रजी, विज्ञान, गणित आणि इत्यादी विषयात कुणाचे कन्सेप्ट त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर आहेत हे सुद्धा मान्य करणारा; हा माझ्या आजवरच्या आयुष्यातील पाहिलेला एकमेव टॉपर.

          दहावी चे वर्ष हे आयुष्यातील अतिमहत्वाचे (लोकांच्या मते), ह्या अतिमहत्वाच्या वर्षात ह्याच व्यक्तीने मराठी ह्या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे सुध्दा शिकवले आजही त्या पहिल्या गद्य पाठाचे नाव आठवते 'आधरियेंचा परीसाचा दृष्टांत ' अश्या अतिमहत्वाच्या वर्षात शाळेतील फलकावर आपले नाव प्रकर्षाने गुणवत्तेच्या यादीत झळकावे या शर्यत्तीत अख्खा वर्ग नेम आखण्यात सज्ज होता (त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो) पण मनाला जाणवत होते शर्यतीच्या अखेर फलकावर त्या व्यक्तीचे नाव असेलच आणि 17 जुन हा दिवस निकालाचा व  निकाल हा आमच्या बाजूने न लागता आमच्या मनाच्या बाजूनेच लागला आणि त्या व्यक्तीचे नाव अखेर शाळेच्या फलकावर उमटलेच, दहावी नंतर शाळा सुटली कॉलेज साठी सगळे निराळ्या ठिकाणी गेलीत पण हे सगळ्यांना ठाऊक होतेच की ती व्यक्ती आयुष्यात उत्तम असा काही तरी करेलच.......

          बहुतेक शिक्षण व्यवस्थेच्या संकल्पनेमुळे, समाजाच्या (मुख्यतः ज्यांची वाट प्रकाशाच्या अलीकडेच थांबली) मागण्या आणि स्वतःची जिद्द पूर्ण करण्यात आपण इतके गुंतत जातो की भौतिक जगापासून फार दुरावलेले असतो आणि अपयश आले की नैराश्य आपल्या मनावर हानी करते व आयुष्यातील प्रवास सुटतो, पण वाटेत अपयश आले तर आपण का विसरतो की आयुष्यातील असंख्य वाट आपल्याला आशेनी हाक मारत आहेत, का घेत नाही आयुष्यातील अपयशाला सकारात्मक विचारांनी, आयुष्यात अपयश नसल्यास यश मिळवण्याची मजा तरी काय.....??


          ज्याला बघून आम्ही लोक आयुष्यातील लक्ष्य गाठण्यास प्रेरणा घेत होतो, अशी ती व्यक्ती ज्याच्या नावाचे अर्थ हे अनंत होते, अशी व्यक्ती आपल्या जीवनाचा अंत कसा ठरवू शकतो...? हे विचार करताना अश्रू मात्र डोळ्यांचे बांध फोडतात.

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वास...