शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वासुदेवाने श्रीकृष्ण यांना गाय पाळणारे  ‘नंद’ यांच्या घरी लपवून ठेवले.
               गाय पाळणारे यांचा संस्कृत नियमावलीत अर्थ लावायचा असल्यास, ‘गोपाळ’ असा निघतो. तेच साहित्य शाखेच्या अभ्यासानुसार गोपाळ या शब्दाचे अपभ्रष्ट रूप हे गोल्ला ऊर्फ गोलकर असे सांगितले. प्रामुख्याने ज्या प्रदेशाच्या वातावरणाने हाक मारली तो प्रदेश आपला मानणारे हेच ते भटकी जमात गोल्ला ऊर्फ गोलकर.
              भटका हा शब्द भूतकाळात विसरल्याने, आता आधुनिकेच्या नशेत भ्रमंती करताना जरा भूतकाळात डोकावून बघितलं. की आठवत ते गायगोधन, आजीने पाठ करून घेतलेलं " दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी", अंगणातील गोविष्टा चे सारवण आणि ह्या सगळ्यांचे महत्व हे एक आठवण म्हणून घर करून बसलेलं आहे. खरं हे आठवण म्हणणे पटतय काय आपल्याला....?
               आजही भूतकाळातील आठवणीने वर्तमानात काही अंश ठेवलेले आताही जाणवते. ज्यासाठी लोक आत्ताही त्या जातीची आठवण काढून फेरफटका मारताना दिसतात. जसे उदाहरण द्यायचे म्हटल्यास, जात पडताळणी, जातीचा दाखला आणि इत्यादी... पणअश्या सगळ्या गोष्टींना अपवाद म्हणजे वर्तमानाला भूतकाळाची आवर्जून जोड देणारे  लोक, आत्ता पण समाजात काही संख्येत सापडतात. ज्यांना आज पण फक्त आणि फक्त समाज प्रबोधना विषयी चिंता असते आणि चिंते पलिकडे त्यांचे समाजावरील काम प्रखरून दिसते.

              जरा खोलवर निरीक्षण केल्यास असा जाणवतंय की आधुनिकतेकडे वळलेल्या समाजाला आजच्या युगात फार महत्त्वाचे मोल आहे. काहींचे यावर पारदर्शकपणे प्रोत्साहन पण आहे. त्यात काही चूक नाही. पण त्याच आधुनिकतेला आपल्या समाजातील भूतकाळाचे महत्त्व असल्याचे विसरतोय काय ...? की आयुष्यातील भ्रमंती दुर्लक्ष करण्यास भाग पाडत आहे…? मला आजही आठवते एकदा दिवाळीत घर स्वच्छ करताना वडिलोपार्जित दुधाचे माप सापडले ते आजींनी आठवण म्हणून ठेवायला मला सांगितलेले. ज्या समाजाने माणूस म्हणून जन्मास आल्यावर एक जीवन जगण्यासाठी अर्थ दिला त्या समाजातील गोष्टींना आठवण म्हणून स्वीकार करणे हे पटने योग्य कसे असेल...?
            आपल्या भूतकाळातील आठवणी हे आपल्या पुढच्या पिढी साठी हि त्यांच्या वडिलोपार्जितांची आठवणच असेल काय...?   जरा मन घट्ट धरून आणि पापण्या बंद करून विचार केला की  असे जाणवते की आधुनिकतेच्या नशे पासून रक्षण करण्यासाठी आपल्याला ही नंदगोपाळच्या घरी आसरा घ्यावाच लागेल…

रविवार, १९ मे, २०१९

नैराश्याचे हिंस्त्र रूप....

        जेव्हा सूर्यकिरणा बरोबर तुमच्या फोनवर संदेश येतो की तुमच्यातील व्यक्ती नाहीस झालंय. तेव्हा असा जाणवत की एक कृत्रिम स्वप्न बघताय की काय.....?  पण एकदा झोप उडाली आणि सत्याशी गाठ झाली की हृदयातील ठोका आणि वेदना यांच्याशी समतोल राखणे हे कठीण असते, हे सांगणे म्हणजे 'मूर्ख' अशी उपमा स्वतःला देणे.

        ओळख झाली वर्ग ८ वी मध्ये प्रसंग शाळेतील क्रिकेट टीम, आमच्यासाठी देव असलेला क्रिकेट टीम चा कॅप्टन हाच तो व्यक्ती, तुला बॅटिंग जमत नाही तू लेफ्टी असल्याने बॉलिंगचा सराव कर, पण कालांतरने सांगणारा क्रिकेट नाही जमणार आपणास, पण सराव सोडू नकोस असेही आवर्जून सांगणारा. जिल्हा स्टेडियम वर पहिल्या ओव्हर मधील पहिल्या बॉल वर ओपनिंग करून; शेवटच्या ओव्हर मधील शेवटच्या बॉल वर टिकून शाळेतील नाव उंचावणारा, फक्त क्रीडा क्षेत्रात नसून वर्ग ८ वी  व ९ वी च्या निकालात वर्गातून प्रथम क्रमांकाने फक्त त्याच्या नावाने नाहीतर अभ्यासातील गोडीने शिक्षकांच्या मनात घर बसवले हे आजही आठवते, वर्गातील हुशार व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा पण इंग्रजी, विज्ञान, गणित आणि इत्यादी विषयात कुणाचे कन्सेप्ट त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर आहेत हे सुद्धा मान्य करणारा; हा माझ्या आजवरच्या आयुष्यातील पाहिलेला एकमेव टॉपर.

          दहावी चे वर्ष हे आयुष्यातील अतिमहत्वाचे (लोकांच्या मते), ह्या अतिमहत्वाच्या वर्षात ह्याच व्यक्तीने मराठी ह्या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे सुध्दा शिकवले आजही त्या पहिल्या गद्य पाठाचे नाव आठवते 'आधरियेंचा परीसाचा दृष्टांत ' अश्या अतिमहत्वाच्या वर्षात शाळेतील फलकावर आपले नाव प्रकर्षाने गुणवत्तेच्या यादीत झळकावे या शर्यत्तीत अख्खा वर्ग नेम आखण्यात सज्ज होता (त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो) पण मनाला जाणवत होते शर्यतीच्या अखेर फलकावर त्या व्यक्तीचे नाव असेलच आणि 17 जुन हा दिवस निकालाचा व  निकाल हा आमच्या बाजूने न लागता आमच्या मनाच्या बाजूनेच लागला आणि त्या व्यक्तीचे नाव अखेर शाळेच्या फलकावर उमटलेच, दहावी नंतर शाळा सुटली कॉलेज साठी सगळे निराळ्या ठिकाणी गेलीत पण हे सगळ्यांना ठाऊक होतेच की ती व्यक्ती आयुष्यात उत्तम असा काही तरी करेलच.......

          बहुतेक शिक्षण व्यवस्थेच्या संकल्पनेमुळे, समाजाच्या (मुख्यतः ज्यांची वाट प्रकाशाच्या अलीकडेच थांबली) मागण्या आणि स्वतःची जिद्द पूर्ण करण्यात आपण इतके गुंतत जातो की भौतिक जगापासून फार दुरावलेले असतो आणि अपयश आले की नैराश्य आपल्या मनावर हानी करते व आयुष्यातील प्रवास सुटतो, पण वाटेत अपयश आले तर आपण का विसरतो की आयुष्यातील असंख्य वाट आपल्याला आशेनी हाक मारत आहेत, का घेत नाही आयुष्यातील अपयशाला सकारात्मक विचारांनी, आयुष्यात अपयश नसल्यास यश मिळवण्याची मजा तरी काय.....??


          ज्याला बघून आम्ही लोक आयुष्यातील लक्ष्य गाठण्यास प्रेरणा घेत होतो, अशी ती व्यक्ती ज्याच्या नावाचे अर्थ हे अनंत होते, अशी व्यक्ती आपल्या जीवनाचा अंत कसा ठरवू शकतो...? हे विचार करताना अश्रू मात्र डोळ्यांचे बांध फोडतात.

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

दुर्गंध आपल्या विचारांचा !!


       स्वप्न मनामध्ये रंगवता रंगवता कधी झोप आली ते कळलेच नाही, संध्याकाळी सुमारे 'पाच' वाजता वडिलांनी  कॉल केला, वडिलांचा कॉल म्हणजे महिन्यात एकदा, फोन मध्ये 'बाबा' असे दिसले आणि स्वप्नांना पूर्णविराम दिला व फोन उचलला......

बाबा: या आठवड्यात दोन, तीन सुट्ट्या आहे, येतोस का घरी.....

मी: बघतो.......कळवतो तुम्हाला. 

     दोन मिनिटे बोलून फोन ठेवला व विचार करत बसलेलो, " जायचे काय घरी..........?" विचारांनी होकार देत पर्यंत ५:२० झाल्याचे घड्याळीने दर्शवलेले, लगेच तयारी केली व पुणे स्टेशन गाठले, वेळेवरची तयारी असल्याने रिजर्ववेशन नव्हते, वेळ होती आता जनरल मध्ये जायची आणि रेल्वे होती 'आझाद हिंद एक्सप्रेस' (हावड़ा) प्लॅट फॉम  क्रमांक ५ वर पोहचलो, जनरलचा डब्बा शोधत निघालो. अखेर डब्बा दिसला, बघतोय तर लोक डब्यातील गेट वर लटकत होते. एक क्षणासाठी असे वाटले की नकोच जायला, पण एकदा ठरवले ते ठरवले, आणि कसाबसा गेटच्या पायऱ्यांवर  चढलो लोकांनी जरा जागा दिली व गेट जवळ उभा राहिलो, ६:२५ ला रेल्वेनी पुणेचा निरोप घेतला आणि प्रवासांच्या गोष्टी रंगात आल्या, रेल्वे हावड़ा असल्याने उत्तरे कडील संख्या जास्त होती त्यामुळे लोकांचे भाषांचे कौशल्य समजेपर्यंत रेल्वे दौंडला पोहचली, रेल्वे इंजिन बदलत असल्याने २० मिनिटांची ब्रेक लोकांच्या हाती लागला , पोटाला चिमटा पकडून ठेवलेले  लोक दौंड मधील वडापाव वर चांगलाच हाथ मारतांना दिसले, वेळेवरची तयारी असल्यानी  पोटाला हातभार म्हणुन थंड्या वडापाव वर मी पण चांगलाच दाव मारला.

         तेवढ्यात तपासणीसाठी दोन पोलीस आमच्या (जनरल) डब्ब्यात शिरली, आम्ही चार, पाच मुले मराठीत बोलत असल्याने त्या पोलीसांनी आम्हाला गोड स्माइल दिली व आपल्या भारतातील उत्तरेकडील लोकांनकडे वळले आणि तपासणी सुरु झाली अणि ही तपासणी सर्वांन समोर न होता शौचालयात होत होती, 'पाच ' लोकांची तपासणी झाली त्यात काही सापडले नसल्याने पोलिस खुश नसून  नाखुश  दिसत होती, नजर तिष्ण असल्याने त्यांना एका प्रवाश्याची ( उत्तेरेकडीलच ) पिशवी दिसली  त्यात  त्यांना पंखा  सापडला  आणि  लगेच  सहाव्या  व्यक्तीचे  स्वागत  शौचलयात  करण्यात  आले , बाहेर आल्यावर  नाखुश  असलेली  पोलीसांच्या  मुखावर  गड  जिंकल्याचे  सुख जाणवत होते  व  त्या  प्रवाश्याचे  पापण्य  फडफडत  होते , एक  जागरूक नागरिक  म्हणून  विचारपूस  केल्यास कळले की मारहाण   करुण  '२००० ' रुपयात  गड  जिंकल्या गेले. आपले गड जिंकलेले शिपाई डब्ब्यातुन उतरतांनी  आम्हा  मराठी बांधवानकडे काही वाक्य बडबडले............


" कुठे ह्या  भैय्या  लोक्कांच्या  दुर्गंधेत  हा प्रवास करता ??......जा आणि स्लिपर  मध्ये बसा "


 दुर्गंध  हा  कधी शरीराचा  नसतोच , असतो तो आपल्या विचारांचा ,आपल्या बेईमाणीचा 

        खरंच या आपल्या सुसंस्कृत  देशाला कीड  लागली आहे काय?...........की ही कीड आपल्या सुसंस्कृत देशाला नसून सुसंस्कृत नागरिकाला लागली आहे ?


                                                           
                                                                         

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

तरुणाईची मोड





आवाज..आवाज..आवाज  या आवाजाने साखर झोपेतून जाग आली बहुतेक ७ वाजलेले असावेत, हा आवाज कसला ??? हे बघण्याकरिता होस्टेलच्या खिडकीतून डोकावून बघितले..... तर दोन लोकांतील ( एक सुमारे ६०-६५ वर्षाचे  वृद्ध व २२-२३ वयोगटातील युवक)  संभाषण कानी पडले

वृद्ध : डाव्या बाजुनी overtake नसते करायचे!!

युवक : तु शिकवणार काय मला? (मोठ्या आवाजाने)

वृद्ध : मी सांगतोय तुला फक्त अथवा माझ्या अंगावरुन गेली असती car

युवक : मला सांगणारा तु कोण लागून गेलास (शिवीगाळ करत)

वृद्ध : इतका माज का??.......काय केलस अस आयुष्यात??

युवक : (शिवीगाळ करत ) Hotel management ची Degree आहे अशी तशी नाही नामांकित college ची आहे

हे सगळ दृश्य बघितल्यावर अस वाटतय कि विसरलोत काय आपण शाळेतील प्रतिज्ञा, विकास (नक्की कुणाचा ?) करण्यात इतके गुंतलोय का? कि नीतिशास्त्र, आई-वडिलांनी केलेले संस्कार , घडवलेले चारित्र्य हे विसरत जातोय ?

बनवू या न या अखंड देशाला महासत्ताक पण अश्या नापाक मनाने नको...........
 

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वास...